पॅलेटवरील अनेक रंगांच्या सरमिसळीप्रमाणेच आयुष्यातले अनेक अनुभव एकमेकांत गुंफत आपल्या चित्रनिर्मितीशी त्यांची सांगड घालत सुभाष अवचट यांनी रेखाटलेली ही अनोखी शब्दचित्रे. ही शब्दचित्रे आहेत कुमारांच्या गाण्याची, तर्कतीर्थांच्या व्यासंगाची, एस. एम. जोशी, ग. प्र. प्रधान यांच्यापासून ते अगदी आचार्य रजनीशांपर्यंत अनेक व्यक्तींची, त्यांच्याशी जडलेल्या स्नेहबंधांची. व्हिन्सेंट व्हॅन गॉगच्या चित्रांच्या, ओतूरच्या वाड्याच्या, पौड येथील चर्चपासून जनसामान्यांमध्ये आढळलेल्या गणेशापर्यंतच्या अनेकानेक आठवणींची ही शब्दचित्रे. अवचटांमधील मनस्वी चित्रकाराच्या निर्मितीमागील प्रेरणांचे दर्शन घडविणारी.
By:
Subhash Awchat Imprint: Popular Prakashan Ltd Dimensions:
Height: 246mm,
Width: 189mm,
Spine: 10mm
Weight: 336g ISBN:9788171855360 ISBN 10: 8171855369 Pages: 182 Publication Date:01 January 2015 Audience:
General/trade
,
ELT Advanced
Format:Paperback Publisher's Status: Active