मर्यादा पुरुषोत्तम राम आदर्श पुरूष होते. त्यांच्यामध्ये सर्व प्रकारचे मानवी गुण होते. श्रीरामा आज्ञाधारक मुलगा होता, प्रेमळ भाऊ होते. पूजनीय पती होते, प्रियमित्र होते आणि आपल्या भक्तांचे हीतचिंतक होते. त्यांचे जीवन प्रत्येक माणसासाठी अनुकरणीय आणि प्रेरणादायी आहे. त्यांनी कधीही अधर्माचा आधार घेतला नाही. सत्य, न्याय आणि धर्मावर त्यांची परम श्रद्धा होती. त्यांनी नेहमी दीन दुबळ्यांना मदत केली. अत्याचार करणाऱ्याचा बिमोड केला तर असत्य आणि अन्यायाचा आयुष्यभर विरोध केला. त्यामुळेच त्यांच्या राज्यात सुख शांतता होती आणि आजही 'रामराज्य"" स्थापन करण्यासाठी प्रत्येक देशातील जनता उत्सुक असते. वास्तविक पाहता त्यांचे जीवन आपल्यासाठी प्रेरणास्त्रोत आहे. इथे त्याच युगपुरुषाची मानवता प्रेमाची, श्रीरामाची अनुपम गाथा इथे रोमांचकारी आणि कादंबरीच्या शैलीत सादर करीत आहोत.